Maha Sports
India's Only Marathi Sports News Magazine

रोहित शर्माने युवराज सिंगचा हा मोठा विक्रम मोडला

0 230

भारतीय संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्माने आज मोहाली वनडेत नाबाद अर्धशतकी खेळी करताना भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा एक खास विक्रम मोडला आहे. त्याने भारताकडून श्रीलंका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ९व्या स्थानावर झेप घेतली आहे.

रोहितने श्रीलंका संघाविरुद्ध ४४ वनडेत ४१.२३च्या सरासरीने १४०२ धावा केल्या आहेत तर युवराजने ५५ वनडेत ३३.३३च्या सरासरीने १४०० धावा केल्या आहेत. रोहितसाठी श्रीलंका संघ कायमच खास ठरला आहे. त्याने वनडेतील सर्वोच स्कोर २६४ याच संघाविरुद्ध केला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याही यादीत अव्वल स्थानावर असून सचिनने ८४ सामन्यात ३११३ धावा केल्या आहेत.

भारताकडून श्रीलंका संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा केलेले खेळाडू
३११३ सचिन तेंडुलकर
२३७६ एमएस धोनी
२१८६ विराट कोहली
१८३४ मोहम्मद अझरुद्दीन
१६९९ वीरेंद्र सेहवाग
१६८८ गौतम गंभीर
१६६२ राहुल द्रविड
१४०२ रोहित शर्मा
१४०० युवराज सिंग

Comments
Loading...
%d bloggers like this: