‘अ’ गटात छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली तर ‘ब’ गटात जय बजरंग वशिंद संघांनी पटकवला स्व. हिंदुह्रदयसम्राट जिल्हास्तरीय कबड्डी चषक

‘अ’ गटात छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली तर ‘ब’ गटात जय बजरंग वशिंद संघांनी पटकवला स्व. हिंदुह्रदयसम्राट जिल्हास्तरीय कबड्डी चष

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय हनुमान क्रीडा मंडळ चामटोळी आयोजित स्व. हिंदुह्रदयसम्राट चषक २०१९ भव्य कबड्डी स्पर्धाचा आयोजन केलं आहे. पंचायत समिती सदस्य बाळाराम कांबरी व भालचंद्र कांबरी हे आयोजक आहेत.

काळ (१३ जानेवारी ) झालेल्या यास्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘अ’ गटात छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली संघाने ओम कबड्डी संघाचा २६-२३ असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले. आत्माराम डोंबिवली व नंदुरबार बदलापूर संघाना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

तर ‘ब’ गटात जय बजरंग क्रीडा मंडळ वशिंद संघाने २६-२१ असा मोरया क्रीडा मंडळ सोनाळे संघाचं पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले. कै. शिवाजी क्रीडा मंडळ व शिव शंकर क्रीडा मंडळ जांभळे याना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मारावे लागले.

‘अ’ गट निकाल:

विजेतेपद– छत्रपती क्रीडा मंडळ, डोंबिवली
उपविजेतेपद– ओम कबड्डी संघ, कल्याण
उत्कृष्ट चढाई– जयनाथ काळे (ओम)
उत्कृष्ट पकड– विजय चव्हाण (छत्रपती)
मालिकावीर– अर्जुन शिंदे (छत्रपती)

‘ब’ गट निकाल:

विजेतेपद– जय बजरंग क्रीडा मंडळ, वशिंद
उपविजेतेपद– मोरया क्रीडा मंडळ, सोनाळे
उत्कृष्ट चढाई– असलम इनामदार (वशिंद)
उत्कृष्ट पकड- चैतन्य माळी (मोरया)
मालिकावीर– अतुल दिसले (वशिंद)