जिल्हा अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत मिहीर आंब्रे, साध्वी धुरीला सुवर्णपदक

पुणे । मिहीर आंब्रे, साध्वी धुरी यांनी पुणे जिल्हा हौशी अ‍ॅक्वेटिक संघटनेच्या वतीने आयोजित कै. रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

टिळक जलतरण तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मिहीर आंब्रेने मुलांच्या खुल्या गटात ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याने २३.७६ सेकंद वेळ नोंदवली. श्वेजल मानकरने २४.८९ सेकंद वेळ नोंदवून रौप्य, तर साहिल पवारने २४.८९ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक पटकावले. याआधी मिहीरने खुल्या गटात ५० व १०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. त्याचबरोबर मिहीरने १०० मीटर फ्रीस्टाइलमध्येही सुवर्णपदक पटकावले होते.

यानंतर मुलींच्या खुल्या गटात हार्मोनी क्लबच्या साध्वी धुरीने २८.५६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. संजना पालाने २९.६६ सेकंद वेळ नोंदवून रौप्य, तर शरॉन शाजूने २९.९१ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक मिळवले. याधी साध्वीने खुल्या गटात १०० मीटर बटरफ्लायमध्ये व १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णयश मिळवले होते.

साहिल गणगोटेला सातवे सुवर्ण
डेक्कन जिमखानाच्या साहिल गणगोटे याने १७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक पटकावले. हे त्याचे या स्पधेर्तील सातवे सुवर्णपदक ठरले. साहिलने १ मि. १२.६२ सेकंद वेळ नोंदवली. अथर्व देशमुखने १ मि. १४.१० सेकंदासह रौप्य, तर आर्या कुलकणीर्ने १ मि. १६.८६ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक मिळवले.

निकाल – १४ वर्षांखालील मुली – १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक – चैत्राली राणे (१ मि. २९.१० से), रुही पुंगलिया (१ मि. २९.९७ से.), ईशा पाटील (१ मि. ३१. ५५ से.).
१७ वर्षांखालील मुली – १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक – ईरावती चेंगलूर (१ मि. २७.८७ से.), स्नेह गोयल (१ मि. २९. १२ से.), साजिरी कामत (१ मि. २९.४४ से.)
खुला गट मुले – १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक – अथर्व देशमुख (१ मि. १४.१० से.), संपन्न शेलार (१ मि. १७. ८१ से.), हार्दिक सावंत (१ मि. २३.२५ से.).
खुला गट मुली – १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक -शेरॉन शाजू (१ मि. २३.८३ से.), अदिती अन्नछत्रे (१ मि. २७.८७ से.), स्वरा शिंदे (१ मि. २८. २१ से.)
१४ वर्षांखालील मुली – ८०० मी. फ्रीस्टाइल – डॉली पाटील (१० मि. ३१.११ से.), दीक्षा यादव (१० मि. ३८.२८ से.), सिया शेट्टी (११ मि. ०७.३८ से.)
१७ वर्षांखालील मुली – ८०० मीटर फ्रीस्टाइल -शाल्मली वाळुंजकर (१० मि. ४७.९९ से.), रिद्धी हगवणे (११ मि. १५.१६ से.), जुई घम (११ मि. ३९.०३ से.).
१७ वर्षांखालील मुले – ८०० मीटर फ्रीस्टाइल – शुभम धायगुडे (९ मि. ०७.१३ से.), युवराज वालिया (९ मि. २६.८५ से.), पार्थ मेधी (९ मि. ४५.६६ से.)
खुला गट मुली – ८०० मीटर फ्रीस्टाइल – डॉली पाटील (१० मि. ३१.११ से.), दीक्षा यादव (१० मि. ३८.२८ से.), शाल्मली वाळुंजकर (१० मि. ४७.९९ से.).
खुला गट मुले – ८०० मीटर फ्रीस्टाइल – शुभम धायगुडे (९ मि. ०७.१३ से.), युवराज वालिया (९ मि. २६.८५ से.), अथर्व भाकरे (९ मि. २९.८१ से.).