प्रो कबड्डी: इंटर झोनल चॅलेंजर वीक आजपासून

प्रो कबड्डीमध्ये या मोसमात सामन्याचा आराखडा थोडा वेगळा आहे. प्रथमच या मोसमामध्ये संघ दोन झोनमध्ये विभागले गेले आहेत. या अगोदर अशी झोनल पध्दती प्रो कबड्डीमध्ये नव्हती. पहिल्या चार मोसमापर्यंत ८ संघ प्रो कबड्डी लीगमध्ये खेळायचे. प्रत्येक संघ बाकीच्या सात संघाविरुद्ध प्रत्येकी २ सामने खेळायचा.

यंदा चार नवीन संघ सामील झाल्याने संघांची संख्या १२ झाली आहे. १२ संघांची दोन झोन मध्ये केली आहे. प्रत्येक झोन मध्ये ६ संघ आहेत. प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमामध्ये प्रत्येक संघ २२ सामने खेळणार आहे. त्यातील १५ सामने ते त्यांच्या झोनमधील संघात खेळणार आहेत. म्हणजे प्रत्येक संघ त्यांच्या झोन मधील उर्वरित ५ संघासोबत प्रत्येकी ३ सामने खेळणार आहे. तर उर्वरित ७ सामने इंटर झोनल चॅलेंजर वीकमध्ये खेळणार आहेत.

इंटर झोनल चॅलेंजर वीकमधील सामने म्हणजे ‘झोन ए’मधील संघ ‘झोन बी’मधील संघासोबत सामना खेळेल. प्रत्येक महिन्यात एक आठवडा हे सामने चालतील. प्रत्येक संघ सहा सामने आंतर झोनलचे खेळतील तर एक सामना वाइल्ड कार्ड सामना प्रत्येक संघाला खेळावा लागणार आहे.

वाइल्ड कार्ड सामने हे ६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत जयपूर येथे होणार आहेत. १ ऑगस्ट रोजी अभिनेता फरहान अख्तर यांच्या हस्ते हे या सामन्यांच (draw) निश्चित झाले.