प्रो कबड्डी: जाणून घ्या प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील बक्षीस रक्कम

यंदाचा प्रो कबड्डीचा मौसम क्रीडा प्रेमींसाठी आणि खेळाडूंसाठी बोनसच घेऊन आला आहे. यंदाच्या वर्षी प्रो कबड्डीमध्ये ४ संघ नव्याने सामील झाले आणि या मौसमामध्ये आता १२ संघ १३ आठवडे १३८ सामने खेळणार आहे हे तर आपण सर्वाना माहिती आहे. पण आता स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेतही खूप मोठी वाढ झाली आहे.

मागच्या वर्षी या स्पर्धेच्या एकूण बक्षीसाची रक्कम होती २ कोटी रुपये. आता यात ४ पटीने वाढ होऊन बक्षिसांची रक्कम ८ कोटी पर्यंत वाढवली आहे.
या स्पर्धेचे जो संघ विजेतेपद मिळवेल त्याला ३ कोटी मिळणार आहे. उपविजेता संघाला १.८ कोटी मिळणार आहेत. तर जो संघ तिसऱ्या स्थानावर राहील त्या संघाला १.२कोटी मिळणार आहेत. तर स्पर्धेत सर्वात मौल्यवान खेळाडूला मिळणाऱ्या रकमेतही मोठी वाढ केली असून आता त्या खेळाडूला मिळणार आहेत ३० लाख रुपये.

बक्षीस रकमा प्रो कबड्डी २०१७ मोसमासाठीच्या
विजेता ३०० लाख
उपविजेता १८० लाख
तृतीय  १२० लाख
चतुर्थ ८० लाख
पाचवा ३५ लाख
सहावा ३५ लाख

वैयक्तिक बक्षिसे
स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू १५ लाख
बेस्ट रेडर १० लाख
बेस्ट डिफेंडर १० लाख
उदयोन्मुख खेळाडू ८ लाख
सर्वोत्कृष्ठ महिला पंच ३.५ लाख
सर्वोत्कृष्ठ पुरुष पंच ३.५ लाख

एकूण बक्षिस रक्कम ८०० लाख