राजे चंद्रराव वॉरिअर्स संघाने पटकावले घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व २ चे विजेतेपद

घाटकोपर प्रतिष्टान आयोजित घाटकोपर कबड्डी प्रिमीयर लीग पर्व दुसरे चे अंतिम दिनी देखील कबड्डीचा थरार पाहावयास मिळाला. घाटकोपर लीग पर्व दुसरीच्या अंतिम विजयाचा मुकुट कोणाच्या माथी चढणार या करिता राजे चंद्रराव वोरीयर्स , भटवाडी साई दर्शन पॅकर्स , आर्यन वॅरियर्स, दिल्ली योद्धा या चार संघांमध्ये चुरस होती.

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आर्यन वॅरियर्स विरुद्ध दिल्ली योद्धा या संघात झाली आर्यन वॅरियर्स २८-१० असा दिल्ली योद्धा पराभव केला. आर्यन कडून दर्पण जाबरे चढाई आदेश सावंत अष्टपैलू व चेतन पानवलकर पक्कड करून आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.दिल्ली योद्धा कडून सुरज मोरे यांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या उपांत्य भटवाडी साई दर्शन १७ गुण व राजे चंद्रराव वोरीयर्स २१ या गुणांनी राजे चंद्रराव वोरीयर्स विजयी होऊन अंतिम फेरीत धडकण्याचा मान मिळवला, भटवाडी साई दर्शने लागोपाठ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत येण्या करीता ओंकार संकपाळ , अंकित घाग , मनीष लाड यांनी चढाईत व विकास शिंदे यांनी पक्कड मध्ये प्रेक्षकांची दाद मिळवली व शर्तीचे प्रयत्न केले, पण सुयोग राजपकरचा चतुःसूत्री खेळ व त्याला मिळालेली अंकुश गुरव याची चढाई मध्ये आणि शुभम शिंदेची पक्कड मध्ये मिळालेली साथ यांच्या जोरावर राजे चंद्रराव वोरीयर्स हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला !

अंतिम फेरीचा सामना एकेशे प्रमाणे चुरशीचा झाला कधी आर्यन वोरीयर्स कडे आघाडी तर कधी राजे चंद्रराव कडे, क्रीडारसिकांनी अलोट गर्दी करीत या सामन्याचा आनंद लुटला व खेळाडूंना भरभरून दाद दिली, आर्यन वोरीयर्स तर्फे दर्पण जाबरे यांनी धडाकेबाज चढाया करून राजे चंद्रराव ला हैराण करून सोडले त्यास आदेश सावंत आणि चेतन पानवलकर यान चांगली साथ दिली पण राजे चंद्रराव चा सुयोग राजापकर यांनी संपूर्ण अनुभव या लीग करीता लावला होता अनुभवाचा फायदा घेत त्यांनी अंकुश गुरव , रोहन बोऱ्हाडे , शुभम शिंदे याच्या साथीने २१-२५ या गुंणानी विजयश्री खेचून आणली व घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित घाटकोपर कबड्डी प्रिमीयर लीग चा अंतिम विजय चषक व रोख रु ५५,०००/- यांचा मानकरी झाले . स्पर्धेत अंतिम विजयी व पराभूत संघातील संपूर्ण खेळाडू आणि सहयोगी सहकर्याना भेटवस्तू देऊन गौवरवण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून सुयोग राजापकर यांस रोख रक्कम, चषक व एल.इ.डी. टीव्ही देऊन सन्मान करण्यात आले, या लीग करता शेवटच्या दिवशी विद्यमान विभागीय आमदार श्री राम कदम , श्री चंद्रकांत मालकर , श्री संजय भालेराव , केदार दीघे , राष्ट्रीय खेळडू संजय वडार , नितीन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

लीग यशस्वी होण्या करित्या श्री निलेश दादा जंगम अध्यक्ष , श्री मोहन पाडावे – उपाध्यक्ष , श्री हेमंत तोडणकर- कार्याध्य्क्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी दिवस रात्री मेहनत घेतली सर्व थरातून उत्कृष्ट आयोजना बद्दल घाटकोपर प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे. मान्यवर अध्यक्षांनी कार्यक्रमाच्या सांगता मनोगत मध्ये सर्व क्रीडारसिक , देणगीदार , संघ मालक, प्रशिक्षक ,खेळाडू व हितचिंतकांच्या आभार मानले.

वैयक्तिक बक्षिसे रोख रक्कम व चषक

साखळीत उत्कृष्ट चढाई – सुयोग राजापकर

साखळीत उत्कृष्ठ पक्कड – चेतन पानवलकर

उदयोन्मुख खेळाडू – सचिन पानमंद 

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पक्कड – चेतन पानवलकर 

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई – दर्पण जाबरे 

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू- सुयोग राजापकर