वरळी स्पोर्टस् क्लब कबड्डी- प्रतिज्ञा मंडळाचा अवघ्या एका गुणाने विजय

मुंबई । कंटाळवाण्या आणि एकतर्फी सुरूवातीनंतर दिवसाचा शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेला शेवटचा सामना, ज्यात प्रतिज्ञा क्रीडा मंडळाने अवघ्या एका गुणाने श्री ज्ञानेश्वर संघाचा पराभव केला आणि वरळी स्पोर्टस् क्लब आयोजित तृतीय श्रेणी कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. तसेच आकांक्षा, सुर्यकांत आणि प्रेरणा या संघांनीही विजय नोंदविले.

वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेचा पहिला दिवस एकतर्फी लढतींचा दिवस होता. अपवाद केवळ शेवटच्या लढतीचा स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी शिवसेनेचे उपविभागप्रमुख हरीश वरळीकर , वरळी स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष तिरूपती शेकेली , सचिव मिलिंद ब्रम्हे, कबड्डी संघटक चंद्रकांत भारती आणि कोषाध्यक्ष व स्पर्धाप्रमुख राजेश सॅमसन उपस्थित होते. स्पर्धेचा उद्घाटनीय सामनाच एकतर्फी झाला. आकांक्षा मंडळाने प्रकाश जाधवच्या सुसाट खेळाच्या बळावर बाबरशेख मंडळाचा 25-7 असा धुव्वा उडवला. दुसऱया सामन्यात सुर्यकांत व्यायाम मंडळाने श्री हनुमान सेवा मंडळाची 33-20 धुळदाण उडवली.

उर्वरित दोन लढती एकतर्फी झाल्dया नसल्dया तरी फार चुरशीच्याही झाल्dया नाहीत. रत्नदीप क्रीडा मंडळाने मध्यंतराला घेतलेली 17-15 अशी दोन गुणांची आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. राजेश लाडने चढाया-पकडींचा जोरदार खेळ करत प्रेरणा मंडळाला आघाडी मिळवून दिली. योग्यवेळी रोहित गुरवने दाखवलेला दमदार खेळ प्रेरणाला विजयपथावर घेऊन गेला आणि अखेर प्रेरणाने रत्नदीपला मागे टाकत 46-32 असा सामना आपल्dया खिशात घातला. शेवटच्या सामन्यात श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळाने प्रतिज्ञा क्रीडा मंडळाचा संघर्ष मोडण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चढाईर्पंत रंगलेला हा खेळ ज्ञानेश्वरचा विराज वरळीकर आणि प्रतिज्ञाच्या संदीप पाटीलच्या वेगवान चढायांमुळे 32-31 थरारक झाला आणि सामन्यात अवघ्या एका गुणाने प्रतिज्ञा मंडळाने बाजी मारली.