१४० वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये जे कधीही घडले नाही ते आज घडले

दुबई । आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या हॅरिस सोहेलने एक खास विक्रम आपल्या नावे केला. त्याने संपूर्ण डावात केवळ एकच षटक गोलंदाजी केली आणि त्यात ३ विकेट्स घेतल्या.

१४० वर्ष जुन्या कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने डावात केवळ एक षटक गोलंदाजी करून ३ विकेट्स घेतल्या नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २६० चेंडूत हॅरिस सोहेलला केवळ ३ विकेट्स घेता आल्या आहेत.

जेव्हा आज हॅरिस सोहेल गोलंदाजीला आला तेव्हा ते षटक होते २६वे. मैदानावर रंगाना हेराथ आणि कुशल मेंडिस खेळत होते आणि धावफलक होता २५ षटकांत ७ बाद ९५.

जेव्हा सोहेलचे पहिले आणि संघाचे २६वे षटक संपले तेव्हा श्रीलंका संघ ९६ ऑल आऊट झाला होता. त्याने २६व्या षटकात पहिल्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे रंगाना हेराथ कुशल मेंडिस आणि नुवान प्रदीप यांना बाद केले.