कॅप्टन कूल धोनीचा हा विक्रम शेवटी वृद्धिमान सहाने मोडलाच

केप टाउन । वृद्धिमान सहाने एमएस धोनीची एकाच कसोटी सामन्यात यष्टीपाठीमागे सर्वाधिक झेल घ्यायच्या विक्रम मोडला आहे. त्याने आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यात १० झेल घेत हा विक्रम केला.

कॅप्टन कूल धोनीने हा विक्रम २०१४-१५मध्ये मेलबॉर्न कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध केला होता. विशेष म्हणजे तो धोनीचा कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता. त्या कसोटीत धोनीने ८ झेल आणि एक स्टंपिंग अशी कामगिरी केली होती.

वृद्धिमान सहाने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ५ असे एकूण १० झेल या सामन्यात घेतले आहेत. त्यामुळे एकाच सामन्यात यष्टीमागे १० खेळाडूंना बाद करणारा सहा हा पहिला भारतीय कसोटी यष्टीरक्षक बनला आहे.

यामुळे एका सामन्यात यष्टीरक्षक म्ह्णून सर्वाधिक झेल (१०) आणि सर्वाधिक बळी (१०) घेण्याचा विक्रम आता सहाच्या नावावर झाला आहे.