१० खेळाडूंना नको होता कुंबळे कोच म्हणून

सध्या भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे पदावरून दूर झाल्यापासून कोहली- कुंबळे वादातील नवनवीन गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या भारतीय संघातील १० खेळाडूंना कुंबळे कोच म्हणून नको असल्याची बातमी आता पुढे येत आहे.

मिड डे या दैनिकाच्या सूत्रांप्रमाणे क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांनी भारतीय संघातील १० खेळाडूंकडून प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याबद्दल फीडबॅक मागितला. विशेष म्हणजे या १० खेळाडूंपैकी एकही खेळाडू कुंबळे यांनी प्रशिक्षक म्हणून पुढे काम पाहावे या मताचा नसल्याची बातमी पुढे येत आहे.

सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल कुंबळे यांनी अगदी पहिल्या भारतीय दौऱ्यापासून भारतीय खेळाडूंना काही नियम घालून दिले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान ते पायदळी तुडवले गेले.

“अनिल कुंबळे खेळाडूंवर खूपच दबाव टाकत होते”, भारतीय संघ वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वी एक खेळाडू असंही म्हणाल्याची बातमी आहे.

भारतीय क्रिकेट बाबत यापूर्वीही अशी गोष्ट सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपलयांच्याबद्दल झाली होती.