२७ वर्षीय सागर कुऱ्हाडेचा कबड्डीमध्ये विश्वविक्रम

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सागर कुऱ्हाडे या खेळाडूने एकाच रेडमध्ये १० गुण घेत नवा विश्वविक्रम बनवला आहे. विजय नवनाथ संघ, लोअर परेलकडून खेळताना गोलफा देवी, कोळीवाडा संघाविरुद्ध त्याने हा विश्वविक्रम केला आहे. 

२६ ते २८ मार्च रोजी दादरच्या दत्ता राऊत मैदानावर झालेल्या विजय बजरंग मंडळ आयोजीत कबड्डी स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. सामन्याच्या पुर्वार्धात रेडला जात सागरने प्रथम बोनस घेतला आणि त्याच रेडमध्ये विरोधी संघातील ७ पैका ७ खेळाडूंना बाद केले. 

यामूळे बोनसतचा १ गुण , खेळाडूंना बाद केल्याचे ७ गुण आणि लोनचे २ गुण अशा १० गुणांची एकाच रेडमध्ये त्याने कमाई केली. 

यामुळे सागर राहत असलेल्या भागात त्याचे मोठंमोठे फ्लेक्स लागले आहेत. तसेच त्यावर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. 

परंतु ह्याच विश्वविक्रमी रेडमध्ये सागर जखमी झाल्यामुळे त्याला सामन्याच्या उत्तरार्धात खेळता आले नाही आणि त्याच्या संघाला ४ गुणांनी निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले.