१० वर्षांचा पुणेकर गोल्फर अर्यमान सिंग सलग १२६६ दिवस अपराजित

१० वर्षीय पुणेकर गोल्फर अर्यमान सिंगने गोल्फच्या या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने भारतीय गोल्फ युनियनने आयोजित केलेल्या ५ स्पर्धा जिंकत आपलेच जुने रेकॉर्ड मोडले आहेत.

झोन स्थरावर या वर्षी खेळल्या गेलेल्या सर्व स्पर्धा अर्यमानने जिंकल्या आहेत. तो झोन स्थरावर सलग ४ वर्ष अपराजित आहे.

हा जिंकण्याचा विक्रम आता सलग १२६६ दिवस झाला आहे. हा भारतीय कनिष्ठ गोल्फ स्पर्धतील आजपर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. त्याने या वर्षी केन्सविल्ले गोल्फ कोर्स, अहमदाबाद, पुणे गोल्फ क्लब, पुणे, ऑक्सफर्ड गोल्फ क्लब आणि कंट्री गोल्फ क्लब, पुणे आणि गाईकवाड बरोडा गोल्फ कोर्स, वडोदरा येथील स्पर्धा जिंकल्या आहेत.