टीम इंडियासाठी सोनियाचा दिनु, कर्णधार कोहलीच्या वन-डेत १० हजार धावा

विशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज विराट कोहलीने खास पराक्रम केला. त्याने वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज तर जगातील १२वा खेळाडू ठरला आहे.

भारताकडून सचिन तेंडूलकर (१८४२६), सौरव गांगुली (११३६३), राहुल द्रविड (१०८९९) आणि एमएस धोनी (१०१२३) यांनी केवळ यापुर्वी वन-डेत १० हजार धावा केल्या आहेत.

विराटने वन-डे कारकिर्दीत २१३ सामन्यात ५९.०२च्या सरासरीने १० हजार धावा केल्या आहेत.

तसेच भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो आता तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने हा विक्रम करताना भारताचा महान कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे.

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे खेळाडू-

३४३५७- सचिन तेंडूलकर, सामने- ६६४

२४०६४- राहुल द्रविड, सामने- ५०४

१८४३२- विराट कोहली, सामने- ३४८

१८४३३- सौरव गांगुली, सामने- ४२१

१६८९२- वीरेंद्र सेहवाग, सामने- ३६३

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीच कोहली; एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले

विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण?

पहिल्यांदाच आजी-माजी कर्णधार कोहली-धोनीबद्दल असे घडले

वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट

असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट