धोनीचा नवा विश्वविक्रम, सचिन, द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील

चेन्नई । आज येथे सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वे अर्धशतक केले आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातली १४वा खेळाडू ठरला आहे.

धोनीने वनडेमध्ये ६६, कसोटीमध्ये ३३ तर टी२०मध्ये एक अर्धशतक केले आहे. धोनी हा अशी कामगिरी करणारा ४था भारतीय खेळाडू आहे. केवळ भारताकडून यापूर्वी सचिन तेंडुलकर (१६४), राहुल द्रविड (१४६) आणि सौरव गांगुली (१०७) यांनी अशी कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे ही कामगिरी करताना आज त्याने भारतीय संघाला बिकट अवस्थेतून बाहेर काढले. ७७ चेंडूत ५३ धावा करताना सयंमी धोनीने केवळ १ चौकार खेचला.