टॉप १०: धोनीने केले आजच्या सामन्यात तब्बल १० विक्रम

चेन्नई । चेन्नई । आज येथे सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वे अर्धशतक केले. भारतीय संघाचा कोलमडलेला डाव सावरताना धोनीने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

१६व्या षटकात धोनी जेव्हा फलंदाजीला आला होता तेव्हा संघाची अवस्था ४ बाद ६४ अशी होती. धोनी जेव्हा ८८ चेंडूत ७९ धावा काढून बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या होती ४९.४ षटकांत ७ बाद २७७. यावरूनच या खेळाडूच्या आजच्या खेळीचा अंदाज येतो. निर्धारित ५० षटकांत भारताने ७ बाद २८० धावा केल्या.

धोनीने आज केलेले विक्रम

– आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वे अर्धशतक, अशी कामगिरी करणारा जगातील १४वा खेळाडू

– अर्धशतकांचे शतक करणारा धोनी ४था भारतीय, यापूर्वी सचिन तेंडुलकर (१६४), राहुल द्रविड (१४६) आणि सौरव गांगुली (१०७) यांनी अशी कामगिरी केली आहे.

-आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० अर्धशतके करणारा केवळ दुसरा यष्टीरक्षक फलंदाज. कुमार सांगकाराच्या नावावर १५३ आंतरराष्ट्रीय अर्धशतके

– धोनी गेल्या ५ डावात पहिल्यांदाच बाद झाला आहे. त्याने गेल्या ५ डावात ४५*, ६७*, ४९* & १* आणि ७९ अश्या खेळी केल्या आहेत.

-चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर धोनी ८ डावात दुसऱ्यांदा बाद झाला आहे.

– वनडे कारकिर्दीत धोनीने जेम्स फॉकनरला ७ षटकार खेचले आहेत. दिलशान आणि वॉटसनला धोनीने वनडे कारकिर्दीत प्रत्येकी ६ षटकार खेचले आहेत.

-धोनीने १०० अर्धशतकांपैकी ६६ शतके ही वनडे कारकिर्दीत तर ३३ कसोटी आणि एक टी२० सामन्यात केले आहे.

-वनडे कारकिर्दीत भारतात भारतीय खेळाडूने ४००० धावा करायची दुसरी वेळ. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने(६९७६) ही कामगिरी केली आहे.धोनीने १०९ डावात ४०५५ धावा केल्या आहेत.

-धोनीने चेपॉक मैदानावर ४०१ वनडे सामन्यांत केल्या आहेत. असे करणारा तो पहिला खेळाडू आहे.

– धोनी यापूर्वी जेव्हा बाद झाला त्या खेळीमध्ये आणि आज या दोन बाद डावात त्याने तब्बल २४१ धावा केल्या आहेत. यापूर्वी धोनीने अशी कामगिरी करताना ३६९ धावा केल्या होत्या.