११३३ खेळाडूंपैकी असा मोठा विश्वविक्रम करणारा शाकिब अल हसन पहिलाच!

साउथँम्पटन। सोमवारी(24 जून) 2019 विश्वचषकात 31 वा सामना बांगलादेश विरुद्ध अफगणिस्तान संघात पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 62 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशच्या या विजयात शाकिब अल हसनने अष्टपैलू कामगिरी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

शाकिबने या सामन्यात फलंदाजी करताना 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच गोलंदाजी करताना त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 29 धावा देत 5 विकेट घेतल्या. याबरोबरच त्याने विश्वचषकामध्ये फलंदाजीत 1000 धावांचा टप्पा आणि गोलंदाजीत 30 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे.

त्यामुळे तो विश्वचषक इतिहासात आत्तापर्यंत खेळलेल्या 1133 खेळाडूंपैकी 1000 धावांचा टप्पा पार करणारा आणि 30 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

त्याने विश्वचषकात खेळताना आत्तापर्यंत 27 सामन्यात 44.17 च्या सरासरीने 1016 धावा केल्या आहेत. तसेच 33 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच शाकिबने 2019च्या विश्वचषकात आत्तापर्यंत  6 सामन्यात 2 शतके आणि 3 अर्धशतकांसह 476 धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजी करताना 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे एका विश्वचषक स्पर्धेत 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

तसेच विश्वचषकातील एका सामन्यात 5 विकेट्स आणि 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी 2011 च्या विश्वचषकात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आयर्लंड विरुद्ध खेळताना असा पराक्रम केला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी अर्जून तेंडुलकर करतोय इंग्लंडला अशी मदत

भारताविरुद्धच्या सामन्याआधी विंडीजला बसला मोठा धक्का; हा मोठा खेळाडू विश्वचषकातून बाहेर

टीम इंडियाने या गोलंदाजाला घेतले इंग्लंडला बोलावून, घेऊ शकतो भूवनेश्वर कुमारची जागा