रोहित-शिखरकडून सचिन-सेहवागच्या विक्रमाची बरोबरी

मोहाली । भारतीय संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी आज दुसऱ्या वनडे सामन्यात १९.२ षटकांत शतकी सलामी दिली. ही या दोघांची वनडेतील सलामीवीर म्हणून १२वी शतकी सलामी होती.

भारताकडून सलामीवीर जोडीने सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. त्यांनी २१वेळा शतकी भागीदारी केली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आता रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्याबरोबर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर ही जोडी आहे. या दोन्ही जोडींनी १२वेळा सलामीला येऊन शतकी भागीदारी केली आहे.