चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज २०१९ स्पर्धेत १३४ खेळाडूंचा सहभाग

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा 25 व 26 मे 2019 रोजी मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे पार पडणार आहे.

स्पर्धेत एकूण 134 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.