शिरूरमधील १४ वर्षीय विद्यार्थ्याचा कबड्डी खेळताना मृत्यू

गौरव अमोल वेताळ या विद्यार्थ्याचा कबड्डी खेळताना मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप गावात ही दुर्दैवी घटना घडली. 

१४ वर्षीय गौरव हा शिक्रापूर येथील नवोदय विद्यालयात आठवीत शिकत होता. शनिवारी सामना सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

हा सर्व प्रकार तेव्हा घडला जेव्हा समोरील संघातील खेळाडू रेडसाठी आला होता आणि त्यावेळी बचाव करणाऱ्या संघातून गौरव खेळत होता. 

यावेळी चक्कर येऊन तो जागेवरच खाली पडला. थोडावेळ काय झाले हे कुणालाही समजले नाही. परंतू नंतर घटनेचे गांभीर्य ध्यानात आल्यावर त्याला त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विशेष म्हणजे हे सर्व होण्याआधी काही सेकंद गौरव स्वत: रेडला गेला होता आणि त्याने एका खेळाडूला बादही केले होते.