कसोटी क्रिकेट १४० वर्षांचं…

0 55

बरोबर १८७७ साली जगातील पहिला कसोटी कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. आल्फ्रेड शॉ या इंग्लंडच्या गोलंदाजाने पहिला चेंडू टाकला होता तर चार्ल्स बँनरमन यांनी पहिली धाव आणि पहिली शतक केलं होत.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या त्यात एकट्या चार्ल्स बँनरमनच्या १६५ धावा होत्या. इंग्लंडचा दुसरा पहिला डाव १९६ धावांवर संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाला ४९ धावांची माफक आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही फलंदाजी ढेपाळली. आणि त्यांचा डाव १०४ धावांमध्ये संपला. १५३ धावांच जिंकण्यासाठी आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १०८ डावात संपुष्टात आला आणि ऑस्टेलियाने ४५ धावांनी विजय मिळवून इतिहासातील पहिली कसोटी जिंकली.
आज बांगलादेश श्रीलंका संघाविरुद्ध त्यांची १०० कसोटी खेळत आहे. बांगलादेश अशी कामगिरी करणारा फक्त १०वा संघ आहे. आजपर्यंत १४० वर्षांत २२५३ कसोटी खेळल्या गेल्या आहेत. त्यातील १५०१ कसोटीचे निकाल लागले आहेत. तब्बल ७५० कसोटी ड्रा राहिल्या आहेत. तर २कसोटी टाय झाल्या आहेत. त्यातील एक टाय कसोटी भारतात खेळल्या आहेत.

C68H9oXWYAY6jR7 300x183 - कसोटी क्रिकेट १४० वर्षांचं…

कोणता संघ कोणत्या साली शंभरावी कसोटी खेळाला:
१९०९ इंग्लंड
१९१२ ऑस्ट्रेलिया
१९४९ द.आफ्रिका
१९६५ वेस्ट इंडिज
१९६७ भारत
१९७२ न्यूजीलँड
१९७९ पाकिस्तान
२००० श्रीलंका
२०१६ झिम्बाब्वे
२०१७ बांगलादेश

आज कोणतं क्रिकेट किती वर्षांचं झालय?

१४० वर्ष: कसोटी क्रिकेट
४६ वर्ष, २ महिने, १०दिवस: एकदिवसीय क्रिकेट
१२ वर्ष, २६दिवस: ट्वेंटी२०

कोण किती कसोटी खेळलं
९८३ इंग्लंड
७९९ ऑस्ट्रेलिया
५२० वेस्ट इंडिज
५१० भारत
४२० न्यूजीलँड
४०९ दक्षिण आफ्रिका
४०७ पाकिस्तान
२५८ श्रीलंका
१०१ झिम्बाब्वे
१०० बांगलादेश
१ आयसीसी वर्ल्ड इलेव्हन

98303.3 300x169 - कसोटी क्रिकेट १४० वर्षांचं…

५१० कसोटीमध्ये भारताची कामगिरी
५१०- खेळले
१३८- जिंकला
१५८- हारला
२१३- ड्रा
१- टाय

Comments
Loading...
%d bloggers like this: