जाणून घ्या १४२ वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास

बरोबर १८७७ साली जगातील पहिला कसोटी कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. आल्फ्रेड शॉ या इंग्लंडच्या गोलंदाजाने पहिला चेंडू टाकला होता तर चार्ल्स बँनरमन यांनी पहिली धाव आणि पहिलं शतक केलं होत.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या त्यात एकट्या चार्ल्स बँनरमनच्या १६५ धावा होत्या.

इंग्लंडचा पहिला डाव १९६ धावांवर संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाला ४९ धावांची माफक आघाडी मिळाली होती. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही फलंदाजी ढेपाळली आणि त्यांचा डाव १०४ धावांमध्ये संपला.

१५३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १०८ डावात संपुष्टात आला आणि ऑस्टेलियाने ४५ धावांनी विजय मिळवून इतिहासातील पहिला कसोटी सामना जिंकला.

कोणता संघ कोणत्या साली शंभरावी कसोटी खेळाला:
१९०९ इंग्लंड
१९१२ ऑस्ट्रेलिया
१९४९ द.आफ्रिका
१९६५ वेस्ट इंडिज
१९६७ भारत
१९७२ न्यूजीलँड
१९७९ पाकिस्तान
२००० श्रीलंका
२०१६ झिम्बाब्वे
२०१७ बांगलादेश

आज कोणतं क्रिकेट किती वर्षांचं झालय?

१४२ वर्ष: कसोटी क्रिकेट
४८ वर्ष, २ महिने, १०दिवस: एकदिवसीय क्रिकेट
१४ वर्ष, २६दिवस: ट्वेंटी२०

कोण किती कसोटी खेळलं
१०१०- इंग्लंड
८२०- ऑस्ट्रेलिया
५४२- वेस्ट इंडिज
५३३- भारत
४३३- न्यूजीलँड
४३२- दक्षिण आफ्रिका
४२३- पाकिस्तान
२८३- श्रीलंका
११४- बांगलादेश

१०७- झिम्बाब्वे

२- अफगाणिस्तान

२- आयर्लंड

१ आयसीसी वर्ल्ड इलेव्हन

५१० कसोटीमध्ये भारताची कामगिरी
५३३- खेळले
१५०- जिंकला
१६५- हारला
२१७- ड्रा
१- टाय