अबब! या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट

पल्लेकेल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ७५ धावांची गरज आहे तर इंग्लंडला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे.

या सामन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. या सामन्यात तब्बल १५ खेळाडू LBW पद्धतीने बाद झाले आहेत.

यात इंग्लंडचे बेन स्टोक्स, राशिद खान आणि मोईन अली दोनदा तसेच श्रीलंकेचा दिलरुवान परेरा दोनदा LBW पद्धतीने बाद झाला आहे.

श्रीलंका देशात केवळ दुसऱ्यांदा फलंदाजांवर कसोटी सामन्यात अशी वेळ आली आहे. यापुर्वी श्रीलंका विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यात याच मैदानावर २०१६मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात १५ खेळाडू LBW पद्धतीने बाद झाले होते.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

१४१ वर्षांतील सर्वात मोठा पराक्रम करण्याची विराटला संधी

टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया...

संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक