भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत केलेले सर्व १५ विक्रम

इंदोर । भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत विजयी आघाडी घेतली. हार्दिक पंड्या ७८, रोहित शर्मा ७१ आणि अजिंक्य रहाणे ७० यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाकडून विजय अक्षरशः खेचून आणला.

गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सगळ्याच आघाडीवर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर मात केली. या सामन्यात भारतीय संघाकडून अनेक विक्रम नव्याने नोंदवले गेले तर काही विक्रम मोडले गेले. हे सर्व विक्रम असे-

#
भारतीय संघाचा हा वनडेत सलग ९वा विजय आहे.

#
ऑस्ट्रेलिया संघ गेल्या १३ सामन्यांपैकी ११ सामन्यात पराभूत झाला असून दोन सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.

#
कोणत्याही मालिकेत प्रथमच भारतीय संघाने सलग ३ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले आहे.

#
भारतीय संघाने सलग ९ वनडे सामने जिंकले आहे. २००८-२००९ साली कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ९ विजय मिळवले होते.

#
कर्णधार विराट कोहली गेल्या ९ वनडे सामन्यात अपराजित आहे. हा भारताकडून विक्रम आहे. धोनी कर्णधार म्हणून सलग ९ सामन्यात अपराजित होता.

#
भारतीय संघ सध्या वनडे आणि कसोटी अशा दोनही क्रमवारीत पहिल्या स्थानावर आला आहे.

#
हार्दिक पंड्याने २०१७ या वर्षात २५ षटकार मारले आहेत. या विक्रमासह या यादीत तो अव्वल स्थानी आहे.

#
अजिंक्य रहाणेने गेल्या ९ वनडेत ६ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्यात त्याने ६२, १०३, ७२, ६०, ३९, ५, ५, ५५, ७० अशा धावा केल्या आहेत.

#
रोहित शर्मा हा २०१३ पासून वनडेत सर्वाधिक षटकार खेचणारा खेळाडू ठरला आहे. त्याने २०१३ पासून वनडेत ११३ षटकार खेचले आहेत.

#
रोहित शर्माने आज ४२ चेंडूत अर्धशतक केले. हे त्याचे वैयक्तिक वेगवान अर्धशतक आहे.

#
रोहित शर्मा हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार खेचणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ६३ षटकार ऑस्ट्रेलिया विरुद्ध मारले आहे.

#
धोनीने आज यष्टीरक्षक म्हणून ७५० बळींचा टप्पा पार केला. त्यात २९४ कसोटीत, ३८९ वनडेत तर ६७ टी२० मध्ये धोनीने बळी मिळवले आहेत.

#
एकही कसोटी न खेळलेल्या खेळाडूंमध्ये ऍरॉन फिंचने ८ वनडे शतके केली आहेत. विलियम्स पोर्टफिल्डने ९ शतके केली आहेत.

#
इंदोर येथील होळकर स्टेडियमवर भारतीय संघाने ५ पैकी ५ वनडे सामने जिंकले आहेत.

#
कर्णधार म्हणून ३८ पैकी ३० वनडे सामने जिंकले आहेत. रिकी पॉन्टिंगने पहिल्या ३८ पैकी ३१ सामन्यात विजय मिळवला होता.