पुणे- एमएसएलटीए योनेक्स सनराईज स्पर्धेत एकूण 150 खेळाडू सहभागी

पुणे । मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत देशभरातून एकूण 150 अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.

ही स्पर्धा एस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट येथे दि.7 ते 13 एप्रिल 2018 या कालावधीत होणार आहे.

तसेच, ही स्पर्धा 16 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटांत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक आणि गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत मुलांच्या गटात सिद्धार्थ जडली, यशराज दळवी, दक्ष अगरवाल, क्रिश वघानी, प्रसाद इंगळे, इंद्रजीत बोराडे, आदित्य जावळे, अनर्घ गांगुली, ओंकार अग्निहोत्री, तर मुलींच्या गटात लोलाक्षी कांकरिया, रिजूल सिडनले, ख़ुशी शर्मा, मधुरिमा सावंत, रिया भोसले, जिया लोढा, सायना देशपांडे, अन्या जेकब हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.