वेगवान १५० बळी घेणारा जडेजा पहिला डावखुरा गोलंदाज

कोलंबो: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने विक्रम करताना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे.

वेगवान १५० विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा पहिला गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनच्या नावावर होता. जॉन्सनने ३४ कसोटी सामन्यात १५० बळी २०१० साली घेतले होते. जडेजाला ही कामगिरी करायला ३२ कसोटी सामने लागले.

कसोटीमध्ये वेगवान १५० विकेट्स घेणारे डावखुरे गोलंदाज
३२ कसोटी, रवींद्र जडेजा
३४ कसोटी, मिचेल जॉन्सन
३५ कसोटी. बिल जॉन्स्टन
३७ कसोटी, ऍलन डेव्हिडस्टोन
४० कसोटी, डेररक अंडरवूड