कर्णधार रोहित शर्माचे वनडेतील १६वे शतक

मोहाली। येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आय एस बिंद्रा स्टडीयमवर भारत आणि श्रीलंका संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने त्याचे १६ वे शतक पूर्ण केले आहे.

रोहितने ११५ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी करताना १ षटकार आणि ९ चौकार मारले आहेत. त्याच्याबरोबर मुंबईचाच फलंदाज श्रेयश अय्यर हा खेळत आहे त्यानेही नाबाद अर्धशतक पूर्ण केले आहे.

रोहितने याबरोबरच आत्तापर्यंत भारतात वनडे क्रिकेटमध्ये ७२ षटकार मारले आहेत. भारतात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत ११९ षटकारांसह एम एस धोनी अव्वल क्रमांकावर आहे. रोहितने हा विक्रम करताना आज सचिनचा ७१ षटकारांचा विक्रमला मागे टाकले आहे.

रोहित या मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळत आहे. भारत सध्या १ बाद २४७ धावांवर खेळत आहे.