मुंबई इंडियन्स टीम इंडियाला देणार नवा जसप्रीत बुमराह

मुंबई| मुंबई इंडियन्स संघाचे चाचणी सत्र उद्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुढच्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत नविन खेळाडूंना संधी देण्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्वाची मानली जात आहे.

या चाचणीत  जम्मु काश्मीरचा 17 वर्षीय वेगवान गोलंदाज रसिक सलामला बोलवण्यात आले आहे. ह्या गोंलदाजाने सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्राॅफीत जम्मु कश्मीरच्या संघाकडून दोन सामने खेळले आहेत. त्यात त्याने तीन विकेट घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थानातील सदस्यांना रसिकच्या वेगाने आणि स्विंगने अचंबित केले आहे. इतक्या लहान वयात रसिकच्या गोलंदाजीत चांगलीच धार दिसत आहे. त्यामुळे त्याला चाचणी शिबिरात बोलावण्यात आले आहे.

श्रीनगरच्या शेई-आय- काश्मीर या मैदानावर झालेल्या टॅलेन्ट हट कॅम्पमध्ये त्याची निवड जम्मू काश्मीरच्या संघात इरफान पठान आणि परवेज रसुुल यांनी केली होती.

तीन वेळच्या मुंबई इंडियन्सच्या संघाने अशाच पद्धतीने जसप्रित बुमराहची संघात निवड केली होती. आता ता भारतीय संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज आहे.

जम्मु काश्मीरच्या फक्त परवेझ रसुलनेच भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 1 वन-डे आणि एक टी-20 सामना खेळला आहे. रसुलने 11 आयपीएल सामने खेळले आहेत. जम्मु कश्मीरचा आणखी एक खेळाडून मंझूर दारला आयपीएलमध्ये किंग्स पंजाबच्या संघाने विकत घेतले होते. त्याला प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

महत्वाच्या बातम्या-