१७ वर्षाखालील नेहरू हॉकी स्पर्धेतील विजयी ‘अँग्लो उर्दू हायस्कूल’ संघाचा सत्कार

पुणे । १७ वर्षाखालील जिल्हा परिषद स्तरावरील नेहरू आंतरशालेय महिला हॉकी स्पर्धेतील विजयी ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’ आणि ‘आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज’ संघाचा सत्कार ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवारी सकाळी आझम कॅम्पस येथे झाला.

यावेळी एस.ए.इनामदार, ‘आझम स्पोर्टस् अकॅडमी’चे संचालक गुलझार शेख, मुख्याध्यापक आयेशा शेख, गफार शेख उपस्थित होते. या संघाने सेंट जोसेफ पाषाण शाळेचा ३- O अशा फरकाने पराभव केला.