बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

५० वर्षांपुर्वी सर गॅरी सोबर्स यांनी एकाच षटकांत चक्क ६ षटकार खेचले होते. ३१ आॅगस्ट १९६८ रोजी पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये असे काहीतरी घडले होते.

१९६८च्या हंगामात ग्लॅमोर्गन आणि नाॅटींगशायर दरम्यान झालेल्या सामन्यात ते नाॅटींगशायरचे नेतृत्व करत होते.

एकवेळ नाॅटींगशायर ५ बाद ३०८ अशी असताना स्वानसीमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात सोबर्स यांनी झटपट धावा करण्यासाठी ही खेळी केली होती. 

लवकर डाव घोषीत करुन गोलंदाजांना लगेच गोलंदाजीची संधी देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता.

माल्कन नॅश हा कमनशिबी गोलंदाजाला तेव्हा या स्फोटक फलंदाजीचा सामना करावा लागला. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या नॅशकडे कर्णधाराने चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूवर षटकार बसल्यावर त्याने गोलंदाजीत बदल केले परंतु सोबर्स यांनी त्याला ६ षटकार खेचलेच.

यातील एका चेंडू तर सोबर्स यांच्या बॅटवर नीट आला नाही. त्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाने त्यांचा झेल घेतला परंतु तो तेव्हा सीमारेषेच्या बाहेर असल्यामुळे हा झेल देण्यात आला.

शेवटच्या चेंडूवर तर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असुनही त्यांनी षटकार खेचला होता.

यानंतर त्यांनी लगेच डाव घोषीत केला आणि ते हा सामना पुढे जाऊन जिंकलेही.

पुढे १७ वर्षांनी रवी शास्त्री यांनी मुंबई विरुद्ध बडोदा सामन्यात (१९८५) हा पराक्रम केला. तर २००७ला युवराज सिंगने टी२० विश्वचषकात हा पराक्रम केला. तसेच हर्षल गिब्जनेही २००७मध्येच ५० षटकांच्या विश्वचषकात विंडीजमध्ये नेदरलॅंडविरुद्ध हा कारनामा केला होता.

एकाच षटकात ६ षटकार मारणारे खेळाडू-

गॅरी सोबर्स (१९६८), रवी शास्त्री (१९८५), हर्षल गिब्ज (२००७), युवराज सिंग (२००७), अॅलेक्स हेल्स (२०१५), रविंद्र जडेजा (२०१७).

यापूर्वी दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर दोन खेळाडूंनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच षटकात ६ षटकार मारले आहेत.

युवराज सिंग आणि हर्षल गिब्स यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात तर सर गारफिल्ड सोबर्स आणि रवी शास्त्री यांनी प्रथम श्रेणी सामन्यात ही कामगिरी केली आहे.

मिस्बाह उल हक आणि अॅलेक्स हेल्स यांनीही सलग ६ षटकार मारले आहेत परंतु ते एकाच षटकात मारले नाहीत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

 वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

 टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…

 ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले

 अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील