‘खो-खो’च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पीयनशिपबद्दल सर्वकाही

१ ते ४ सप्टेंबर २०१८ दरम्यान लंडन येथे खो-खो या भारतातील देशी खेळाची जगातील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे.

या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाने काल मान्यता दिली. याचा अर्थ या स्पर्धेसाठी गेलेल्या संघातली सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचा खर्च आता भारत सरकार करणार आहे.

ज्या खेळांना भारत सरकारकडून अनुदान मिळत नाही अशा खेळांमध्ये खो खोचा समावेश होतो. परंतु या नियमांत थोडी शिथीलता आणुन या देशी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

खो खो फेडरेशन आॅफ इंग्लंडने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात भारतासह एकुण ४ देश सहभागी होत आहेत.

ह्या स्पर्धेपुर्वी तब्बल २० लोकल संघांची इंग्लंडमध्ये राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली होती. तर भारताने या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा तबब्ल ६० वर्षांपुर्वी १९५६मध्ये घेतली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

 वॉचमनच्या मुलाची झाली आशिया कपसाठी टीम इंडियात निवड

 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद

 बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

 याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

 वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी