मला त्या विषयावर बोलायचं नाही- एमएस धोनी

दुबई। 25 सप्टेंबरला भारताचा एशिया कप 2018 मधील सुपर फोरचा तिसरा सामना पार पडला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झाला. अखेर नाट्यपूर्ण झालेला हा सामना बरोबरीत सुटला.

या सामन्यात भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. तर अफगाणिस्तानला एका विकेटची गरज होती. हे षटक अफगाणिस्तानचा प्रतिभाशाली गोलंदाज राशीद खानने टाकले.

यानंतर जेव्हा समालोचक रमीझ राजा यांनी कर्णधार धोनीला विचारले की तूमचा संघ नक्की कुठे चूकला? यावर उत्तर देताना धोनी म्हणाला, ” मला नाही वाटत आम्ही काही चुकलो आहोत. आम्ही आमच्या संघातील मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली होती. तसेच फिरकीपटूही संघात नव्हते. पहिल्या काही षटकांत आम्ही जास्त धावा दिल्या. फलंदाजीत आम्ही चांगली सुरुवात केली. आम्ही अजून चांगल्या फटक्यांची निवड करायला हवी होती. ”

“याशिवाय या सामन्यात दोन खेळाडू धावबाद झाले तसेच मला काही विषयांवर बोलायचं नाही नाहीतर मला यासाठी शिक्षा होईल.” असे धोनी यावेळी म्हणाला.

यावेळी धोनीचा इशारा हा पंचांच्या चुकलेल्या निर्णयाकडे होता. या सामन्यात पायचीतचे दोन निर्णय भारताच्या विरोधात गेले. यात कर्णधार धोनी आणि दिनेश कार्तिक यांना चुकिच्या पद्धतीने पायचीत देण्यात आले. हा सामना बरोबरीत सुटण्यासाठी हे एक मोठे कारण ठरले.

महत्वाच्या बातम्या –

विराट कोहलीने धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यामागील हे आहे सिक्रेट

अखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच!

Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार