पहिली वनडे: भारतीय फलंदाजी कोलमडली, २९ धावात ७ फलंदाज बाद

धरमशाला। येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतने १६.४ षटकात २९ धावातच ७ बळी गमावले आहेत.

श्रीलंका कर्णधार थिसेरा परेराने या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचा श्रीलंकन गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचललेला आहे.

मजबूत फलंदाजांच्या फळीसाठी ओळखला जाणाऱ्या भारतीय संघाची आज श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वाईट अवस्था केली आहे. भारतचे सलामीवीर शिखर धवन(०) आणि रोहित शर्मा(२) आज लवकर बाद झाले.

त्यानंतर दिनेश कार्तिक(०), मनीष पांडे(२), आज वनडे पदार्पण करणारा श्रेयश अय्यर(९), हार्दिक पंड्या(१०) आणि भुवनेश्वर कुमार(०) यांनी देखील लवकर बळी गमावले. अनुभवी फलंदाज एम एस धोनी खेळपट्टीवर टिकून आहे सध्या त्याच्याबरोबर कुलदीप यादव फलंदाजी करत आहे.

श्रीलंकेकडून सुरंगा लकमल (४), अँजेलो मॅथ्यूज(१) आणि नुवान प्रदीप(२) यांनी बळी घेतले आहेत.