पहिली टी२०: नाणेफेक जिंकून भारताने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय

रांची । येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

भारताच नेतृत्व विराट कोहली करत आहे तर ऑस्ट्रेलियाचा नेतृत्व डेव्हिड वॉर्नर करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार स्टिव्ह स्मिथ या सामन्याला मुकणार आहे.

तीन सामन्यांच्या या मालिकेत भारत चांगली सुरुवात करून वनडे मालिके प्रमाणेच वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल तर ऑस्ट्रेलिया मागील वर्षी ऑस्ट्रेलियात टी२० मालिकेत मिळालेल्या व्हाइट वॉशचा बदला भारताकडून घेण्याचा प्रयत्न करेल.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या डॅनियल क्रिस्तियन आणि अॅन्ड्रयू टाई यांना ऑस्ट्रेलियाच्या संघात संधी देण्यात आली आहे. तर भारताच्या फलंदाजीच्या यादीत मनीष पांडेला के एल राहुलच्या जागी स्थान देण्यात आली आहे.

भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यज्वेंद्र चहल, जसप्रित बूमरा.

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स, डॅनियल क्रिस्तियन, टिम पेन, नॅथन कॉल्टर-नील, अॅन्ड्रयू टाई, अॅडम झाम्पा, जेसन बेहेरेन्डॉरफ.