डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे असे असेल भारतासमोरील लक्ष !

रांची । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८.४ षटकांत ११८ धावा केल्या. पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे अधिकृत स्कोररने ऑस्ट्रेलियाचा डाव याच धावसंख्येवर पूर्ण झाल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे जरी पाऊस थांबला तरी ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा फलंदाजीसाठी येणार नाही.

जर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारताला नवीन लक्ष दिले तर ते असे असेल
५ षटकांत: ४१
६ षटकांत: ४८
७ षटकांत: ५५
८ षटकांत: ६२
९ षटकांत: ६९
१० षटकांत: ७५
१२ षटकांत: ८७
१५षटकांत: १०४

ऑस्ट्रेलियाकडून एरन फिंचने सर्वाधिक म्हणजेच ४२ धावा केल्या. त्याने आपला वनडे मालिकेतील फॉर्म कायम राखत चांगला खेळ केला आहे.
दुखापतग्रस्त स्टिव्ह स्मिथच्या डेविड वॉर्नर या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. पण त्याला कर्णधाराला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला चहलने दौऱ्यात चौथ्यांदा बाद केले. त्यानंतर फॉर्ममध्ये दिसत असलेला फिंचही १०व्या षटकात कुलदीप यादवचा शिकार बनला.

ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाचे फक्त ३ फलंदाज दोन आकडी धावसंख्या बनवू शकले. ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज त्रिफळाचित झाले. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५व्यांदा असे झाले.

भारताकडून कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत तर भुवनेश्वर हार्दिक आणि चहलने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे. विराटने ही चांगले क्षेत्ररक्षण करत क्रिश्चनला धावचीत केले.