पहिली कसोटी: भारताच्या दुसऱ्या डावात बिनबाद १००

कोलकाता । येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या २४ षटकांत १०० धावा झाल्या आहेत. सलामीवीर केएल राहुल ५७ धावांवर तर शिखर धवन ४२ धावांवर खेळत आहेत.

सध्या भारतीय संघ २२ धावांनी पिछाडीवर आहे.

अर्धशतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलने गेल्या ११ कसोटी डावात ९व्यांदा अर्धशतकी खेळी केली आहे.

तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव २९४ धावांत संपुष्ठात आला. त्यांना पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी मिळाली होती. भारताकडून भुवनेश्वर कुमार ४, मोहम्मद शमी ४ आणि उमेश यादव २ यांनी विकेट्स घेतल्या.