पहिली कसोटी: विराट कोहलीने टीम इंडियाला तारले

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 76 षटकात 274 धावांवर संपूष्टात आला आहे. भारताकडून विराट कोहलीने शतक केले.

तसेच इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचा अनुभवी सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूक चौथ्या षटकातच शून्य धावांवर असताना त्रिफळाचीत झाला आहे. त्याला पहिल्या डावाप्रमाणे या डावातही भारताचा फिरकी गोलंदाज आर आश्विनने बाद केले.

कूक बाद झाल्यानंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवला. दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने 1 बाद 9 धावा केल्या आहेत. तर केटन जेनिंग्स नाबाद 5 धावांवर खेळत आहे. तसेच दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने 22 धावांची आघाडी मिळवली आहे.

तत्पूर्वी भारताने पहिल्या डावाची सुरुवात काहिशी अडखळत केली. भारताचे सलामीवीर फलंदाज मुरली विजय(20), शिखर धवन(26) आणि केएल राहुल(4) हे तीन फलंदाज लवकर बाद झाले आहेत. या तिघांनाही इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करनने बाद केले.

त्यानंतर अजिंक्य रहाणेने विराटला थोडीफार साथ दिली. मात्र तोही 15 धावा करत बाद झाला. त्याच्या पाठोपाठ लगेचच दिनेश कार्तिकही शून्यावर बाद झाला. यामुळे भारताची अवस्था 5 बाद 100 धावा अशी झाली.

परंतू विराट आणि हार्दिक पंड्याने हा भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकलाही यात अपयश आले. त्याला 22 धावांवर असताना करननेच पायचीत बाद केले. एका बाजूने भारताच्या विकेट जात असताना विराटने दुसरी बाजू भक्कमपणे संभाळली होती.

त्याने हार्दिक बाद झाल्यानंतर तळातल्या फलंदाजांना साथीला घेत धावफलक हालता ठेवला. त्याने इशांत शर्माबरोबर 35 धावांची भागीदारी केली. इशांतला आदील रशीदने 5 धावांवर बाद केले.

यानंतर विराटने उमेश यादवला(1*) साथीला घेत शेवटच्या विकेटसाठी 57 धावांची अर्धशतकी भागीदारी रचत भारताला 274 धावांचा टप्पा गाठून दिला. पण तरीही भारत पहिल्या डावात 13 धावांनी पिछाडीवर राहिला आहे.

विराटने या डावात 225 चेंडूत 149 धावा केल्या. यात त्याने 22 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटचे हे इंग्लंडमधील कसोटीत पहिलेच शतक आहे. तसेच कसोटी कारकिर्दीतील एकूण 22 वे शतक आहे.

तसेच इंग्लंडकडून या डावात सॅम करनने 74 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर अन्य गोलंदाजापैकी जेम्स अँडरसन (2/41), आदील रशीद (2/31) आणि बेन स्टोक्स (2/73) यांनी विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक:

इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद 287 धावा

भारत पहिला डाव: सर्वबाद 274 धावा

इंग्लंड दुसरा डाव: 1 बाद 9 धावा

(केटन जेनिंग्स नाबाद खेळत आहे.)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज

‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी

कसोटी क्रिकेटमध्ये कबूतराने मिळवली पहिली विकेट