पहिली कसोटी: कोहलीचे शतक, श्रीलंकेसमोर जिंकण्यासाठी ५५० धावांच लक्ष

कर्णधार विराट कोहलीच्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर ५५० धावांच लक्ष ठेवलं आहे. भारताने आपला दुसरा डाव ५३ षटकांत २४०/३ वर घोषित केला.

भारतीय संघाने पहिल्या डावात ६०० धावा केल्या होत्या. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही जबदस्त फलंदाजी करत भारताने फक्त ५३ षटकांत २४० धावांवर आपला डाव घोषित केला. ज्यात विराट कोहली नाबाद १०३, अभिनव मुकुंद ८१ आणि अजिंक्य रहाणे नाबाद २३ यांच्या धावांचा समावेश राहिला. भारताने दुसऱ्यांदा एवढं मोठं लक्ष जिंकण्यासाठी एखाद्या संघासाठी ठेवलं आहे.