पहिली कसोटी: भारतीय फलंदाजांची हाराकिरी, इंग्लंडने १०००वा सामना जिंकला

बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.

भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी 194 धावांचे आव्हान होते. पण भारताचा डाव 162 धावांतच संपुष्टात आला.

भारताने या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात तिसऱ्याच दिवशी 78 धावातच 5 विकेट गमावल्या होत्या.

त्यामुळे चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात 5 बाद 110 धावांपासून सुरुवात केली. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली 43 धावांवर आणि दिनेश कार्तिक 18 धावांवर नाबाद खेळत होते.

पण दोन धावांची भर घालत दिवसाच्या सुरुवातीलाच कार्तिक बाद झाला. त्यामुळे भारतावरील दबाव वाढला असतानाच अर्धशतक करत एक बाजू संभाळणारा कोहलीला बेन स्टोक्सने बाद करत हा दबाव आणखी वाढवला.

कोहलीने या डावात 93 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यात त्याने 4 चौकार मारले आहेत.

कोहलीही बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ नव्हती. तरीही 9व्या क्रमांकावर आलेल्या इशांत शर्माने 11 धावा करत हार्दिकला साथ दिली होती. पण त्याला आदिल रशीदने पायचीत बाद केले.

त्यानंतर अखेर हार्दिकला स्टोक्सनेच बाद करत भारताचा डाव 54.2 षटकातच संपुष्टात आणला. हार्दिकने 61 चेंडूत 4 चौकारांच्या सहाय्याने 31 धावा केल्या.

इंग्लंडकडून या डावात स्टोक्सने 40 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी आदिल रशीद(9/1), जेम्स अँडरसन(50/2), स्टुअर्ट ब्रॉड(43/2) आणि सॅम करन(18/1) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 287 धावा केल्या होत्या. यात कर्णँधार जो रुट आणि जॉनी बेअरस्टोने अर्धशतके केली होती.

तर भारताने पहिल्या डावात कोहलीच्या शतकाच्या जोरावर सर्वबाद 274 धावा केल्या होत्या. यामुळे इंग्लंडला फक्त 13 धावांची आघाडी दुसऱ्या डावात घेता आली होती.

दुसऱ्या डावात इशांत शर्माने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडला 180 धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. इंग्लंडकडून या डावात करनने फक्त एकमेव अर्धशतक केले.

गोलंदाजीत भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 7 विकेट घेतल्या तर इंग्लंडकडून स्टोक्सने 6 विकेट घेतल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक:

इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद 287 धावा

भारत पहिला डाव: सर्वबाद 274 धावा

इंग्लंड दुसरा डाव: सर्वबाद 180 धावा

भारत दुसरा डाव: सर्वबाद 162 धावा

सामनावीर: सॅम करन (5 विकेट , 87 धावा)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले

-अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना

-कोहलीला भेटायच स्वप्न भंगल, विजय मल्ल्याचा या कारणामुळे झाला…