रणजी ट्रॉफी: मुंबईचा मोसमातील पहिलाच विजय; शॉ, लाडची चमकदार कामगिरी

भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज अखेरच्या दिवशी मुंबईने ओडिसा संघावर १२१ धावांनी विजय मिळवला. या विजयात धवल कुलकर्णी आणि आकाश पारकर या मुंबईकर गोलंदाजांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

काल दिवसाखेर दिवसाखेर ओडिशा संघाची धावसंख्या ४ बाद ९३ अशी होती. त्यात १९८ धावांची आज भर घालून संपूर्ण संघ बाद झाला. शंतनू मिश्रा या खेळाडूने ओडिशाकडून खेळताना सर्वाधिक अर्थात ४९ धावांची खेळी दुसऱ्या डावात केली.

मुंबईचा हा रणजी इतिहासातील हा ४९९ वा सामना होता. मुंबई संघाचा ५०० वा सामना बडोदा संघाविरुद्ध ९ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी युवा फलंदाज पृथ्वी शॉ आपला १८वा वाढदिवस साजरा करणार आहे.

संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद- २८९ धावा
ओडिसा पहिला डाव: सर्वबाद- १४५ धावा
मुंबई दुसरा डाव: ९ बाद २६८ घोषित
ओडिशा दुसरा डाव: सर्वबाद २९१ धावा
मुंबईने ओडिशावर १२१ धावांनी विजय मिळवला.