भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: भारताला पहिला झटका रोहित शर्मा तंबूत परत !

कोलकाता l येथे चालू असेलल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला पहिला झटका बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा तंबूत परतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज कोल्टर-नाईलने स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतः झले घेऊन रोहितला बाद केले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. ईडन गार्डेनवर वनडे मधील विश्वविक्रमी म्हणजेच २६४ धावा करणाऱ्या रोहित शर्माकडून भारताला अपेक्षा होत्या पण कोल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर सरळ फटका मारण्याच्या नादात बॅटच्या तळाचा कड लागून चेंडू सरळ कोल्टर-नाईलच्या हातात गेला आणि तो बाद झाला.

भारताने या सामन्यातील संघात एकही बदल केला नाही तर ऑस्ट्रेलियाने जेम्स फॉल्कनर व अॅडम झम्पा यांना बसवून ऍस्टन एगार व केन रिचर्डसन यांना संघात स्थान दिले आहे. भारताची धावसंख्या ४३ वर १ अशी असून, अजिंक्य राहणे २७ तर विराट कोहली ६ धावांवर नाबाद आहे.