केवळ २० वय असेलल्या त्या खेळाडूचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश

17 जानेवारीपासून श्रीलंका संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी 13जणांच्या ऑस्ट्रेलिया संघात 20 वर्षीय विल पुकोवस्कीचा समावेश करण्यात आला आहे.

त्याने आत्तापर्यंत फक्त 8च प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. यात त्याने 49 च्या सरासरीने 588 धावा केल्या आहेत. त्याने ऑक्टोबरमध्ये शेफिल्ड शिल्डमध्ये सुरुवातीलाच वेस्ट ऑस्ट्रेलिया विरुद्ध विक्टोरिया संघाकडून खेळताना 243 धावांची खेळी केली होती. पण त्यानंतर त्याने काही मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे विश्रांती घेतली होती.

त्याच्याबरोबरच जो बर्न्स आणि मॅथ्यू रेनशॉ यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन केले आहे. मात्र शॉन मार्श, मिशेल मार्श, पिटर हँड्सकॉम्ब आणि ऍरॉन फिंच यांना कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. त्यांची भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटीमालिकेत खराब कामगिरी झाली होती. त्याचाच फटका त्यांना बसला आहे.

मिशेल मार्शला मागील वर्षी संघाचे संयुक्तरित्या उपकर्णधारपद देण्यात आले होते.

त्यांच्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाच्या निवड समीतीचे अध्यक्ष ट्रेवर हॉन म्हणाले, ‘अपेक्षेप्रमाणे ऍरॉन, पिटर, शॉन आणि मिशेलने कामगिरी केलेली नाही. त्यांना अनेक चांगल्या संधी देण्यात आल्या होत्या. पण त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही.’

‘पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्यासाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे बंद झाले आहेत. ते भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहेत. ते मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी आमच्या संघातील महत्त्वाचे भाग आहेत.’

17 जानेवारीला श्रीलंका संघ ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दिवस रात्र तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर 24 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ – 

मार्कस हॅरिस, जो बर्न्स, ंमॅथ्यू रेनशॉ, उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, विल पुकोवस्की, मार्नस लॅब्यूशाने, टिम पेन(कर्णधार), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवूड, पिटर सिडल.

महत्त्वाच्या बातम्या-

आता टीम इंडिया खेळू शकते अमेरिकेबरोबर अमेरिकेत क्रिकेट, जाणून घ्या कारण

टीम इंडिया विरुद्धच्या वन-डे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का!

‘कॉफी विथ करन’ शो हार्दिक पंड्या, केएल राहुलला भोवला, बीसीसीआय देणार ही मोठी शिक्षा!