भारत १ बाद २००, विराट कोहलीची शतकी खेळी

कोलंबो, श्रीलंका । येथे सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने २६व्या षटकातच २०० धावा धावफलकावर लावल्या आहेत. यात विराट कोहलीने शतकी तर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली.

६ चेंडूत ४ धावा करून शिखर धवन बाद झाल्यावर कोहलीने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. शतकी खेळीत त्याने ८२ चेंडूत ११४ धाव केल्या. यात १५ चौकार तर २ शतकारांचं समावेश होता.

रोहित शर्माने विराटला उत्तम साथ देत ६८ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि ३ षटकार खेचले.