स्टुअर्ट ब्राॅडला कपिलच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासुन भारतीय गोलंदाज रोखु शकले नाहीत!

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

जरी इंग्लंड संघ पराभवाच्या छायेत असला तरी चौथ्या दिवशी २९ चेंडूत २० धावा करणाऱ्या स्टुअर्ट ब्राॅडने एक खास पराक्रम केला.

१२१ कसोटीत त्याने १९.५३च्या सरासरीने ३००८ धावा केल्या. त्याला ३ हजार धावा करण्यासाठी केवळ १२ धावांची गरज होती.

३ हजार धावा करताच या खेळाडूच्या नावावर दोन खास विक्रम झाले. कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात २००० धावा आणि २०० विकेट्स घेणारा तो तिसरा अष्टपैलु खेळाडू ठरला.

यापुर्वी इंग्लंडच्याच इयान बाॅथम यांनी इंग्लंडमध्ये २९६९ धावा आणि २२६ विकेट्स तर भारताच्या कपिल देव यांनी भारतात २८१० धावा आणि २१९ विकेट्स घेतल्या होत्या. आता या खास विक्रमात ब्राॅडचा समावेश झाला आहे.

तसेच कसोटीत ३००० धावा आणि ४०० विकेट्स घेणारा तो पाचवा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. यापुर्वी कपिल देव, रिचर्ड हॅडली, शेन वार्न आणि शाॅन पाॅलोकने हा कारनामा केला आहे.

ब्राॅडने १२१ कसोटीत ३००८ धावा आणि ४२४ विकेट्स घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?