११ वर्षांनंतर रविंद्र जडेजाच्या बाबतीत झाला हा खास योगायोग

मँचेस्टर। आज(9 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या बाबतीत खास योगायोग झाला आहे.

जडेजाने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 34 धावा देत न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज हेन्री निकोल्सची विकेट घेतली. त्याने सामन्याच्या 19 व्या षटकात निकोल्सला त्रिफळाचीत करत बाद केले. निकोल्सची विकेट ही न्यूझीलंडची दुसरी विकेट होती.

विशेष म्हणजे 2008 ला झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघात झालेल्या उपांत्य सामन्यातही जडेजाने न्यूझीलंडच्या मायकल गप्टिल-बुन्सला त्रिफळाचीत केले होते आणि ही देखील न्यूझीलंडची दुसरी विकेट होती.

तो सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 3 विकेट्सने जिंकला होता आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विश्वचषकही जिंकला होता.

खास गोष्ट म्हणजे 2008 च्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व विराट कोहलीने केले होते, तर न्यूझीलंडचे नेतृत्व केन विलियम्सनने केले होते.

आजच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जसप्रीत बुमराहने चौथ्याच षटकात मार्टिन गप्टिलला बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला होता. न्यूझीलंडने 42 षटकात 4 बाद 170 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

असा पराक्रम करणारा एमएस धोनी दुसराच यष्टीरक्षक

हिटमॅन रोहित शर्माला हे तीन खास विक्रम करण्याची आज आहे सुवर्णसंधी

व्हिडिओ: कोहली म्हणतो, सामन्याआधी विलियम्सनला या गोष्टीची करुन देणार आठवण!