क्रिकेटर जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ग्लोव्हजमध्ये ठेवतो स्क्वॅशचा चेंडू…

१२ वर्षांपुर्वी २००७च्या विश्वचषकात  ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला पराभूत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.  हा सामना त्यांनी डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ५३ धावांनी जिंकला होता.

यावेळी ऑस्ट्रेलियाचा महान विकेटकीपर आणि फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सगळ्यात जास्त धावा केल्या होत्या. त्याने 104 चेंडूत विक्रमी 149 धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे यावेळी त्याच्या उजव्या हाताच्या ग्लोव्हजमध्ये स्क्वॅशचा चेंडू होता. याचा उपयोग त्याला बॅटवरील पकड मजबूत करण्यासाठी झाला होता, असे गिलख्रिस्ट त्यावेळी म्हणाला होता.

या धावा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वाधिक धावा ठरल्या. गिलख्रिस्टला त्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

त्यापुर्वी असा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगने केला होता. त्याने २००३च्या विश्वचषकात नाबाद १४० धावा केल्या होत्या.

यानंतर मात्र श्रीलंकेच्या संघाने त्याच्यावर खेळाविषयी असलेल्या भावनेचा आणि पंरपरेचा अनादर केला असे आरोप लावले होते.

मात्र एमसीसीने ( मेलबर्न क्रिकेट क्लब) हे आरोप फेटाळले. एमसीसीने असे सांगितले की, गिलख्रिस्टने खेळांच्या किंवा क्रीडाप्रकाराविरूद्ध अशी कोणतीही कृती केलेली नव्हती. कारण अशा स्वरूपाच्या कोणत्याच मर्यादा तेव्हा नव्हत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.