टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त ‘०’ धावा

क्रिकेट जगतात सर्वाधिक विक्रम होतात. हा असा खेळ आहे जिथे प्रत्येक चेंडूनंतर काहीतरी विक्रम होतो. त्यातही हा खेळ जर ५ दिवसांच्या अर्थात कसोटी प्रकारातील असेल तर विक्रमांची अक्षरशः रांग असते.

क्रिकेटच्या याच प्रकारात एक असा विक्रम खास विक्रम आहे ज्यातील नावे वाचून आपण अवाक व्हाल. क्रिकेटमध्ये असे ५ कसोटीपटू आहेत ज्यांनी कसोटीमध्ये शतकांपेक्षा जास्त ० धावांवर बाद झाले.

#१ इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज माइक गॅटिंगने ७९ कसोटी सामन्यात १० शतके केली तर १६वेळा तो ‘०’ धावांवर बाद झाला.

#२ इंग्लंडचाच दुसरा दिग्गज कसोटीपटू माइक अथरटन याचीही काही वेगळी अवस्था नाही. त्याने तब्बल १९९ कसोटी सामने खेळले. त्यात तो १६ वेळा शतकी खेळी करू शकला तर २० वेळा ‘०’ धावांवर बाद झाला.

#३ श्रीलंकेचा माजी कर्णधार मरावान आटापटूने ९० कसोटी सामन्यात १६ शतके केली आणि २२ वेळा तो ० धावेवर बाद झाला.

#४ त्याच देशाच्या सनाथ जयसूर्याचीही काही वेगळी परिस्थिती नाही. त्याने ११० कसोटी सामने खेळताना १४ शतके केली तर १५वेळा ० धावेवर बाद झाला.

#५ या यादीतील एक खास नाव म्हणजे न्युझीलँडचा माजी कर्णधार ब्रेंडॉन मॅकलम. त्याने १०१ कसोटी सामन्यात १२ शतके केली आहेत तर १४ वेळा तो ० धावसंख्येवर बाद झाला.

या यादीत एकमेव भारतीय फलदांज:
या यादीत भारताचे एकमेव खेळाडू आहेत. ते म्हणजे मोहिंदर अमरनाथ. त्यांनी ६९ कसोटीत ११ शतके करणारे अमरनाथ १२ वेळा ० धावेवर बाद झाले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश

एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक