भारतीय संघाचा तो एकच खेळाडू घेतो गावसकरांचा सल्ला

भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी खुलासा केला आहे की सध्याच्या भारतीय संघातील फक्त उपकर्णधार अजिंक्य रहाणे त्यांच्याकडे फलंदाजीचे सल्ले विचारण्यासाठी येतो.

याबद्दल आजतकशी बोलताना गावस्कर म्हणाले, “सध्या मला सल्ला विचारण्यासाठी कोणताही फलंदाज येत नाही. आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, व्हिव्हिएस लक्ष्मण सारखे खेळाडू दौऱ्यावर असताना बऱ्याचदा माझ्याशी बोलायचे.”

“पण ही पिढी वेगळी आहे. त्यांना वेगवेगळे प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक आहेत. फक्त अजिंक्य रहाणे कधीकधी माझ्याकडे येतो.”

याबरोबरच त्यांनी भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की शिखरचा कसोटी सामन्यांसाठी असलेला दृष्टीकोन योग्य नाही.

ते म्हणाले, “शिखर त्याच्या खेळात बदल करु इच्छित नाही. त्याला ज्याप्रकारे खेळून यश मिळाले आहे त्याच खेळावर त्याचा विश्वास आहे. तुम्ही मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तसे फटके खेळू शकता, कारण तिथे स्लीपला खुप क्षेत्ररक्षक नसतात. ज्यामुळे तेथून चौकार मिळतो.

“पण कसोटीमध्ये अशा फटक्यांमुळे तुम्ही फक्त बाद होऊ शकता. जोपर्यंत तो त्याच्यात बदल करत नाही तोपर्यंत त्याला कसोटीमध्ये परदेशात संघर्ष करावा लागणार आहे.”

याबरोबरच त्यांनी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची भारताचे माजी महान कर्णधार कपिल देव यांच्याशी तुलना होऊ शकत नाही असेही म्हटले आहे.

त्याचबरोबर त्यांनी सांगितले की लॉर्ड्सवर होणाऱ्या कसोटीत भारतीय संघाने जर नाणेफेक जिंकली तर प्रथम फलंदाजीचा निर्णय घ्यावा कारण कोणताही संघ सामन्याच्या चौथ्या डावात 200 च्या आसपासच्या धावसंख्येचा पाठलाग करताना संघर्ष करतो. 

भारताचा इंग्लंड विरुद्ध दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर गुरुवार, 9 आॅगस्टपासुन सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

फाफ डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत हा खेळाडू करणार दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व

या ट्विटमुळे संजय मांजरेकर चाहत्यांकडून ट्रोल

मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले महत्त्वाचे पाउल