ती एक पोस्ट आणि कामरान अकमलवर चाहते पडले तुटून

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल त्याच्या इंग्लिश बोलण्यावरुन आणि गचाळ यष्टीरक्षणामुळे कायमच जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या थट्टेचा विषय असतो.

यावेळी मात्र चांगली कामगिरी करुनही कामरान अकमलला चाहत्यांनी ट्विटरवर ट्रोल करायचे सोडले नाही.

नुकतेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाने कामरान अकमलची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल अकमलला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकाचा पुरस्कार दिला.

8 ऑगस्टला पार पडलेल्या या पुरस्कार वितरन समारंभात कामरान अकमल उपस्थीत राहू शकला नाही. त्यामुळे कामरान आकमलच्या वतीने युवा फलंदाज इमाम उल हकने पुरस्कार स्विकारला आहे.

यांची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ट्विटरवर फोटो शेअर करुन दिली. मात्र पीसीबीच्या या ट्विटनंतर कामरान आकमलवर ट्रोलर्स तुटून पडले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-अंबाती रायडूसाठी भारताचा सलामीवीर उतरला मैदानात

-ऑस्ट्रेलियाची साडेसाती संपेना, पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच बॅकफूटवर