आज आहेत दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंचे वाढदिवस !

२०१७मध्ये इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक गाजवणाऱ्या महिला क्रिकेट संघातील दीप्ती शर्मा आणि पूनम यादव या दोन खेळाडूंचा आज वाढदिवस आहे. पूनम यादव आपला २७वा वाढदिवस आज साजरा करत असून दीप्ती शर्मा २१वा वाढदिवस साजरा करत आहे.

दीप्ती शर्मा:
२१ वर्षीय दीप्ती शर्माचा जन्म हा सहारणपूर, उत्तरप्रदेश मधील असून तिने भारताकडून आजपर्यंत ३९ एकदिवसीय आणि १५ टी२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात तिने १२३० धावा केल्या असून ४७ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात ९३ धावा आणि १४ बळी घेतले आहेत.

पूनम यादव:
२७ वर्षीय पूनम यादवचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेशचा असून तिने भारताकडून १ कसोटी, ३२ एकदिवसीय आणि ३८ टी२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात तिने ६८ धावा केल्या असून ४९ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात ११ धावा आणि ५३ बळी घेतले आहेत.