टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा २०१९चा विश्वचषक ठरणार शेवटचा!

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाला आता एक वर्षापेक्षा कमी काळ राहिला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९च्या विश्वचषकात दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाची अलिकडील काळातील कामगिरी पाहता या विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी भारत प्रमुख दावेदार असेल.

या विश्वचषकात भारताकडून आपला पहिला विश्वचषक खेळण्यासाठी केएल राहुल, हार्दीक पंड्या, जसप्रीत बुमराह हे सज्ज आहेत. तर दुसरीकडे वयाची तीशी पार केलेल्या खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो.

या लेखात शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या संभाव्य खेळडूंचा घेतलेला हाआढावा-

1. महेंद्र सिंग धोनी

महेंद्र सिेंग धोनी २०१९ विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतला चौथा विश्वचषक असेल. यापूर्वी धोनीने २००७ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कारकिर्दीतला पहिला विश्वचषक खेळला होता. त्यानंतर त्याने २०११ आणि २०१५ विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत २०११ विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले.

३६ वर्षीय धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत एकदिवसीय आणि टी-२० कर्णधार पदावरून पायउतार झाला असला तरी त्याची २०१९ विश्वचषकात भारतीय संघाची जागा जवळपास नक्की आहे.

२०२३ साली धोनीचे वय ४०असेल त्यामुळे पुढच्या विश्वचषकापूर्वी धोनी कदाचीत निवृत्त झालेला असेल.

धोनीने ३२१ एकदिवसीय सामन्यात ५१.२६ च्या सरासरीने १००४६ धावा केल्या आहेत.

2. रोहित शर्मा

सध्याच्या काळातील सर्वोत्तम सलामिवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोतकृष्ट खेळाडू म्हणून क्रिकेट जगतावर आपला ठसा उमठवला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतके करून त्याने ते सिद्धही केले आहे.

२०१९ विश्वचषकात रोहितची कामगिरी भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. त्याचा वरच्या फळीतील अनुभव भारतीय फलंदाजीची ताकद असेल.

रोहितने त्याच्या कारकिर्दीतील १८3 एकदिवसीय सामन्यात ४४.९९ च्या सरासरीने ६७४८ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन द्विशतके, सतरा शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंडमधिल विश्वचषकात त्याचे भारतीय संघातील स्थान नक्की आहे. मात्र 31 वर्षीय रोहितचा पुढच्या विश्वचषकातील सहभाग त्याच्या कामगिरी व शारीरिक तंदुरूस्तीवर अवलंबून असेल.

3.शिखर धवन

2015 विश्वचषकात भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 412 धावा केल्या होत्या. 2019 विश्वचषकातही भारतीय संघासाठी शिखर धवनची भूमिका महत्वाची असेल. रोहित शर्माच्या जोडीने त्याने गेल्या तीन वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. धवनने 2013 पासून कसोटी  क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

हा विश्वचषक शिखर धवनचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. ३३ वर्षीय धवनाचे वय २०२३ साली ३७ असेल. तसेच संघात स्थान टिकवण्यासाठी नव्या खेळाडूंशी स्पर्धा यांचा विचार करता त्याची २०२३ विश्वचकात निवड होने एकंदरीतच अवघड आहे.

शिखर धवनने १०५ एकदिवसीय सामन्यात ४५.७२ च्या सरासरीने ४४८१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १३ शतक आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

उपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल

वाढदिवस विशेष: फॅब-4 मधील केन विलियमसनबद्दल माहित नसलेल्या या 5 गोष्टी

बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता